तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे आणि या व्यवसायाची निवड आपण का केलीत?
समाज सेवा करण्याचे काही आपला वेळ आपण अशा कामासाठी द्यावा असे वाटत होते. त्याच वेळेस म्हणजे 2012 मध्या सेवा सहयोग join केले volunteer activity करता. तिथे 2014 मध्ये एका survey दरम्यान CP असलेली मुले निदर्शनास आली. नंतर स्वतः त्या बद्दल शिकत गेले आणि 2017 नंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ सेवा क्षेत्रात काम सुरू केले. Community based therapy असे सुरू केले. सेवा सहयोग ने त्यांच्या कक्षे मध्ये हा प्रकल्प सुरू केला. आम्ही वस्तीमधील विशेष मुलांच्या गरजा ओळखून त्यावर काम करतो. मुले, पालक, शिक्षक असे एकत्रित काम करतो. सध्या physiotherapy, विशेष शिक्षण असे काम चालू आहे. २ सेंटर वस्ती मध्ये आहेत १ सेंटर ReGain ह्या नावाने निवारा पुणे येथे चालू आहे. सगळी मिळून ५० पेक्षा अधिक मुलांपर्यंत पोहोचलो आहोत.

इतर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे कसे, काय सांगाल ?
ह्यात स्पर्धक असे काही नाही. मुले आणि पालक ह्यांच्या जवळचे सेंटर कोणते, शाळा कोणती ह्याचा विचार करून पालकांनी अशा सेंटर्स किंवा शाळांना जोडून घ्यावे आणि त्यात सातत्य ठेवावे.
तुमच्या या सेवेतून समाजातील कुठली गरज तुम्ही पूर्ण करत आहात व कशी करत आहत?
सध्याच्या धकाधकी आयुष्यात पालकांना मुले उशिरा होतात काही कारणांनी गर्भधारणेच्या वेळेस, मूल गर्भात असताना अथवा प्रसूतीच्या वेळेस अनेकविध कारणांनी, व्यसनाधीनता , मारहाण किंवा मुलाला नंतर आलेला ताप अथवा फिट, TV mobile अती वापर मुलांच्या मधील प्रश्नाकडे गंभीरपणे पाहण्यासाठी प्रवृत्त करतो. असे विशेष मुल असलेले पालक अनेक धावाधाव करतात, प्रयत्न करतात आणि सातत्य नाही राहिले अथवा मुलांमधील अपेक्षित बदल नाही दिसले तर थेरपी सेंटर अथवा शाळा बदलत राहतात. सध्या ReGain चे धोरण असे आहे की सर्व थेरपी आपण एका छताखाली देऊ शकतो का? पालकांना विश्वास वाटेल असे सेवा देणे हेच खरेतर काम आहे.

यशस्वी व्यावसायिकांमध्ये कुठले गुण असावेत असे तुम्हाला वाटते?
डोक्यावर बर्फ, सारासार विचार, आपले सहकाऱ्यांवर विश्वास हे ३ सर्वात महत्त्वाचे गुण व्यावसायिकांमध्ये असावेत असे मला नेहमी वाटते. त्याचबरोबर व्यवसाय करताना सचोटी आणि आत्मविश्वास हा देखील तितकाच महत्वाचा आहे.

Email: anitaghatnekar@gmail.com
Phone: +91 9881714890
Add comment