तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे आणि या व्यवसायाची निवड आपण का केलीत?
मी बोटांच्या ठशाच्या माध्यमातून तुमची तुमच्याशी नव्याने ओळख करून देते . तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याची क्षमता या टेस्ट मधे आहे।
वयोगट-शून्य ते शंभर
1989 साली माझा मुलगा 3 वर्षाचा झाला तेंव्हा वाटले की त्याला play group ला घालावे पण त्या वेळी तळेगावात play group ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती .. मग विचार आला आपणच सुरू करावी आणि 1991 साली Shreeyash Nursery या नावाने play school सुरू केली. अतिशय छान response मिळाला..शाळा चालवताना लक्षात आले की पालक खूप गोंधळलेले आहेत.. मुलांच्या समस्यांना सोडवण्यात त्रेधातिरपीट होतेय त्यांची. मग मी positive parenting ( सकारात्मक पालकत्व. सुजाण पालकत्व)या विषयाचं रीतसर ट्रेनिंग घेतलं अनुभव तर होताच गाठीशी रोज वेगवेगळ्या पालकांच्या अणि मुलांच्या समस्या हाताळत होते. खूप छान वाटलं .. वेग वेगळ्या सोसायटी शाळांमधे पालकत्वाचे सेमिनार घ्यायला सुरुवात केली. पालक तर खुष होते पण काही बाबतीत मलाच कुठेतरी समाधान वाटत नव्हतं कारण प्रत्येक मूल वेगळं. प्रत्येक पालक वेगळे प्रत्येकाचे एकाच पद्धतीने समाधान कसे होईल? ही उणीव भासू लागली आणि मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग (Where there is a will there is a way) आणि मला Fingerprint analysis ची ही आधुनिक पद्धत माहिती झाली. त्याचा सखोल अभ्यास केला आणि जादूची कांडी फिरावी तसा सर्वच समस्या सोडवण्याचा मार्ग स्पष्ट झाला. फक्त मुलं आणि पालक एवढेच मर्यादित नं राहता प्रत्येक व्यक्तिच्या समस्यांचं चुटकीसरशी निराकरण होऊ लागलं । बदलत्या परिस्थितीत दृष्टिगोचर होणारी समस्या म्हणजे घटस्फोट त्याचेही समाधान आपल्याला यात मिळते।
2013 पासुन मी या क्षेत्रात आहे.. आज पर्यंत 2000+ लोकांना मदत करू शकले हे सांगताना खूप आनंद होतो। डोंबिवलीत सुद्धा एक ऑफिस आहे. आज मी एक successful समुपदेशक(counselor) आहे
USP – इतर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे कसे, काय सांगाल?
माझ्या प्रोफेशन ची beauty आहे की तुम्हाला एकही प्रश्न नं विचारता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. tension free जगता येतं. One step solution for all your problems is my tagline.
तुमच्या या सेवेतून समाजातील कुठली गरज तुम्ही पूर्ण करत आहात व कशी करत आहत ?
- पालकांना मुलांचे संगोपन करण्यासाठी मदत करणे
- पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद निर्माण करणे
- प्रत्येक व्यक्तीस आनंदी आयुष्य जगता यावे यासाठी मार्ग दर्शन
- स्वतः कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देते.
- करियर काउंसिलिंग
- महिला सक्षमीकरणात पण महत्वपूर्ण योगदान आहे
- कौटुंबिक जीवन सुखाचे व्हावे यासाठी मार्गदर्शन.
यशस्वी व्यावसायिकांमध्ये कुठले गुण असावेत असे तुम्हाला वाटते ?
यशस्वी उद्योजका मध्ये आवश्यक असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे आपण करत असलेल्या कामाशी प्रामाणिक असणे। आपल्या व्यवसायावर श्रद्धा असणे त्यासाठी सदैव तत्पर असणे आणि महत्वाचे म्हणजे त्या व्यवसायातील शिक्षण घेण्यासाठी सदैव तयार असणे.
Learning is a life time process हे ब्रीदवाक्य असावे.
Contact : 9028562457
Email : aparnakhoatgmail.com
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100004575076258&mibextid=ZbWKwL
Add comment