रविवार दि. २८ नोव्हेम्बर २०२१ रोजी, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती क्लबने रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या सोबत एक सिनर्जी प्रोजेक्ट केला. कोथरूड येथील स्नेह पॅराडाईज या गृह संकुलात तेथील गृह कर्मचारी, कामवाल्या स्त्रिया, स्वयंपाकीणी, ड्रायव्हर तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. हा प्रोजेक्ट पी पी डॉक्टर मोहन पारांजपे यांच्या साहाय्याने व मंगेश फाउंडेशन यांच्या सहभागाने पार पडला. या शिबिराचे उदघाटन पुणे पर्वती क्लबचे अध्यक्ष रो. शेखर तसेच हेरिटेज क्लबचे अध्यक्ष रो. विनायक पेठे यांनी संयुक्त रित्या केले. हेरिटेज क्लबच्या निर्वाचित अध्यक्षा रो. स्वाती मुळे यांचा देखील या शिबिराच्या आयोजनात मोलाचा सहभाग होता. IPDG रश्मी कुलकर्णी यांनी देखील ह्या शिबिराला आपली मोलाची उपस्थिती लावली.
सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत चाललेल्या या शिबिरात एकंदरीत ५० व्यक्तीनी आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी IPDG रश्मी कुलकर्णी, अध्यक्ष शेखर व रागिणी लोणकर, स्वानंद समुद्र, सचिव अमर कोटबागी, डॉ. मोहन व शारदा परांजपे, हेमंत खिरे, किरण व वृन्दा वाळिंबे, रमेश व अमिता भागवत, पराग गोरे, मानसी कऱ्हाडकर यांच्या सोबत अनेक सदस्य व ऍन्स या शिबिराला उपस्थित होते.
Add comment