Book Name : आय एम एन आंत्रप्रिन्युअर
Language: मराठी
Authors: पराग गोरे
Category: बिझनेस आणि व्यवस्थापन
Publication: बिझनेस मंत्रा
Pages: 316
Binding: Paperback
Hard Copy
Price: 30% OFF
R 450/-. R 315/-
कुठलाही उद्योजक त्याच्या उद्योगाला सुरवात करताना एकटाच असतो. एका ध्येयाने, एक स्वप्न घेऊन त्याच्या परीने धडपड करून तो पुढे जात असतो. मागे खेचण्यासाठी त्याला असंख्य आव्हाने त्याच्या अवतीभवती असतात, पण तो सर्व आव्हानांना पुरून उरतो आणि आपले स्वप्न साकार करतोच करतो.
हा ‘उद्योजक’ म्हणजेच ‘आंत्रप्रिन्युअर’.
‘आंत्रप्रिन्युअर’ या मूळ इंग्रजी शब्दाची व्याख्या जर आपण वेगळ्या प्रकारे समजून घेतली तर ‘आंत्रप्रिन्युअर’ म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या ‘अंत:प्रेरणे’ने आपल्या कामात नावीन्य आणि कौशल्य आणण्याचा सातत्याने प्रयत्न करते, जी उद्योगात फायदा कमविण्यासाठी आर्थिक धोका पत्करतेच परंतु त्याच्याच जोडीला त्याच्याच जोडीला ते काम हे तिचं एक ‘पॅशन’ बनलेले असते. तिच्या मधील ‘उद्यमशीलता’ तिला कधीच स्वस्थ बसून देत नाही आणि तिला त्या साऱ्याच्या सार्थ अभिमान देखील असतो.
‘आंत्रप्रिन्युअर्स’च्या कर्तृत्वाचा हाच धागा पकडून ‘आय एम एन आंत्रप्रिन्युअर!’ या पुस्तकाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील जोमाने काम करणाऱ्या काही उद्योजकांशी संवाद साधून, त्यांच्या कामातून त्यांची उद्योग करण्या मागची थॉट प्रोसेस जाणून घेतली आहे. त्यांचा उद्योग हि त्यांची पॅशन कसं बनलं आहे हे या पुस्तकातून उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न येथे केला आहे.
तसेच ‘सेकंड जनरेशन आंत्रप्रिन्युअर्स’, ‘व्यवसाय म्हणजे लॉटरी नाही’ या लेखांमधून मान्यवरांच्या अनुभवांचे बोल तर मार्केटिंग, डिजिटल उद्योजकता, फ्रँचाईजी मॉडेल या विषयांवर कुठल्याही उद्योजकाला त्याच्या व्यावसायिक वाटचालीत मार्गदर्शक ठरतील असे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी उलगडलेले ‘बिझनेस मंत्रा’ या पुस्तकात उलगडले आहेत.
या पुस्तकाच्या माध्यमातून उद्याचे उद्योजक घडण्यासाठी काही ठिणग्या नक्की पडतील याची खात्री बाळगतो.
Add comment