Business Icon

I Have An Idea

Ashwin_Books_IHaveAnIdea

Book Name : आय हॅव ऍन आयडिया!

Language: मराठी

Authors: पराग गोरे 

Category: बिझनेस आणि व्यवस्थापन

Publication: बिझनेस मंत्रा

Pages: 213

Binding: Paperback

Hard Copy Price: 20% OFF
R 250/-. R 200 /-

आज आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या उद्योग व्यवसायात आहोत. हा व्यवसाय सुरु करण्या अगोदर आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात कधी ना कधी हे चमकून गेलं होतं की येस.. ‘आय हॅव एन आयडिया !’, जी प्रत्यकक्षात आणून मी पैसे मिळवू शकतो.  

मग कुणाला मस्त पैकी ओपन कोफी हाऊस, रेस्टोरंट, ट्रॅव्हल टुरिझम, आपल्या आवडीच्या प्रॉडक्टसचं ट्रेडिंग किंवा मेन्युफॅक्चरिंग ते अगदी आय.टी. कंपनी काढून पैसे कमवण्याची ‘आयडिया’ सुचली असेल. जेंव्हा या ‘बिझनेस आयडिया’ तुमच्या डोक्यात येतात तिथपासून ते, त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास अतिशय जोखमीचा असून तो काळजीपूर्वक अभ्यासू वृत्तीने पार पाडला तर यशाची शिखरं गाठायला आपल्याला मूळीच वेळ लागणार नाही.

आज आपण बाजारपेठेत डोकावलंत तर अशीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की एकेकाळी त्या उद्योजकांची ही एक छोटीशी ‘बिझनेस आयडिया’  होती.  एका खमंग ‘बाकरवाडी’ची निर्मिती करून ती जगभर विकण्यासाची ‘आयडिया’ चितळे बंधू मिठाईवाले यांना सुचली, तर जयंत साळगावकर यांना ‘कालनिर्णय’ नावाची दिनदर्शिका काढायची ‘आयडिया’ सुचली, ‘सुंदर कलात्मक फर्निचर’ तयार करून विकण्याची ‘आयडिया’ एकबोटे फर्निचर्स यांना सुचली तर आपल्याला कॉटनचे कपडे घालायला आवडतात तर याच कपड्यांची निर्मिती आपण स्वतः तयार करून विकूयात ही ‘आयडिया’ कॉटन किंगच्या प्रदीप मराठे यांना क्लिक झाली… ते अगदी ऑनलाईन फ्रेंडशिपचं जाळं जगभर पसरवण्याची फेसबुकची ‘बिझनेस आयडिया’ मार्क झुकेरबर्ग याला सुचली.

या आणि यांसारख्या अनेक भन्नाट ‘बिझनेस आयडियाज्’ आपल्या कडे ही नक्कीच असतील. आपण त्याबद्दल कोणाशी बोललेही असाल किंवा हे मनात ठेऊनच नोकरी सोडायच्या योग्य वेळेची जर आपण वाट पाहत असाल तर आपण ‘उद्याचे उद्योजक’ बनणार आहात हे आधी लक्षात घ्या.

या पुस्तकातून एक ‘बिझनेस मंत्रा’ आपल्या हाती लागणार आहे . हा एक असा मंत्र आहे की जो मनापासून वाचून तो प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला तर ‘आय हॅव एन आयडिया !’ असं वाटणाऱ्या प्रत्येकाची ‘यशस्वी उद्योजक’ होण्याची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील.

जे उदयोजकतेची स्वप्नं पाहात आहेत, उद्योजकतेच्या पूर्णत्वाचा जे ध्यास घेत आहेत आणि जे उद्योजक्ते विषयी कुतूहल बाळगून आहेत अशा प्रत्येकाच्या व्यवसाय वृद्धीच्या विचारांमध्ये ‘व्हॅल्यू एडिशन’ करणारं हे पुस्तक असून एक उद्योग-व्यवसाय यशस्वी करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींचा विचार यात मांडण्यात आला आहे.

आपण जर उद्योजक-व्यावसायिक आहात किंवा नव्याने व्यवसायात पडलेले असाल तर हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करेल.

Business Icon

Add comment