काणे फूड्स ही एक फूड प्रोडक्शन करणारी कंपनी असून महाराष्ट्रीयन फराळाचे पदार्थ निर्मिती ही कंपनीची खासियत आहे. कंपनीची स्थापना २०१० रोजी झाली आणि घरातूनच चिरोटे या पदार्थापासून खाद्यनिर्मितीचा श्रीगणेशा झाला. श्रीमती. मंजिरी काणे आणि श्री. महेश काणे हे सुरुवातीला स्वतःच पदार्थ बनवत नंतर २ ते ३ महिलांच्या मदतीने सुरु झालेल्या या उद्योगाने आता सुमारे १५ ते २० महिलांना रोजगार दिला आहे.
चिरोटे, करंजी यासारखे पदार्थ बाहेर मिळतात पण उत्तम क्वालिटी आणि वाजवी दर असलेले पदार्थ मिळतीलच, याची शक्यता कमी असते. त्यामुळे लोकांना आपले महाराष्ट्रीयन फराळाचे क्वालिटी पदार्थ मिळावेत याच हेतूने कंपनी काम करत आहे. साजूक तुपातले चिरोटे, ओल्या नारळाची करंजी, ओल्या नारळाची आंबा करंजी, साजूक तुपातले बेसन लाडू, साजूक तुपातले मिक्स पिठाचे पौष्टिक लाडू आणि साजूक तुपातली बालुशाही याचबरोबर नारळवडी आणि नारळ आंबावडी हे सर्व पदार्थ आम्ही ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रमाइज न करता पुरवतो.
सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात या पदार्थांचा विसर पडत चालला आहे. फक्त दिवाळीतच हे पदार्थ बघायला मिळतात आणि नवी पिढी तर या पदार्थाना पाहून नाक मुरडते किंवा निम्याना तर हे पदार्थ माहितीच नसतात. परंतु काणे फुड्सच्या माध्यमातून या मराठमोळ्या पदार्थांची चव नवीन पिढीला चाखायला मिळत आहे. येत्या काही वर्षात काणे फुड्सचे खाद्यपदार्थ संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशात आणि परदेशातही सहज उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
२०१६
स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन, पुणे यांच्यातर्फे साधनाताई गोरे स्मृती प्रित्यर्थ महिला उद्योजिका पुरस्कार प्राप्त! (सन्मानपत्र व ट्रॉफी)
Contact: +919604753389
Add comment