‘ट्राईब छतरी’ हा पुण्यात पर्वती पायथ्याशी असलेला एक आगळावेगळा उपक्रम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची फ्रांचायजी असलेलं हे आउटलेट म्हणजे आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी जणू एक वरदान आहे. श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे हे या उपक्रमाचे सर्व काम बघत असतात. गेली 22 वर्ष भारतातल्या सर्व ठिकाणी विखरून जगत असलेल्या आदिवासी भागात जाऊन त्यांचं जीवन जवळून बघितलेल्या आणि त्यांचे लाखो फोटो काढलेल्या श्रीकृष्ण परांजपे यांच्या पॅशन मधून साकारलेला हा उपक्रम आहे. याठिकाणी आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी बनवलेल्या असंख्य कलाकृती आहेत, त्यामधून भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसा झळकतोय. या वस्तू वेगवेगळ्या प्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहेत, हे एकदा आउटलेट ला भेट दिली की जाणवतंच. आलेला माणूस भान विसरतो आणि नैसर्गिक कलेच्या या दुनियेत हरवून जातो.
कलाकृतींची गुणवत्ता :
तसं बघितलं तर भेट देण्यासाठी कोणती वस्तू द्यावी याचे काही कधी नियम नसतात. पण इथल्या कलाकृतींची वैशिष्ट्यं म्हणजे तुम्ही त्या इथं विविध सण, सोहळे, प्रसंग यात तर देऊ शकता पण बाहेरगावी किंवा परदेशात देखील सहज नेऊ शकता. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे या वस्तूंचं वजन, आकार कमी असतो आणि त्या हातानं बनवलेल्या असतात. याशिवाय नकळत तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत असता. परदेशात जाणाऱ्या लोकांना त्यांचे तिथले नातेवाईक नेहमी सांगत असतात की तुम्ही येताना अशा काही गोष्टी आणा जी अस्सल भारतीय आहे, ज्याला भारतीय टच आहे. म्हणजे झगझगीत रंग, लाकडाचे हत्ती, घोडे किंवा राजस्थानी पेंटिंग्ज, काहीवेळा धार्मिक संदर्भ असलेल्या गोष्टी असं काही तरी… या सगळ्या अपेक्षा इथल्या कलाकृती पूर्ण करतात. या निमित्तानं भारतीय कला जगात पोचली जाते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हातानं बनवण्याबरोबरच या सगळ्या कलाकृती पर्यावरण पूरक आहेत. या वस्तू बांबू, केन, जुट, गवत, लाकूड अशा विविध नैसर्गिक वस्तूंचा, त्यांना त्यांच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या गोष्टीचा वापर करून त्यांनी बनवलेल्या असतात. या वस्तू खरेदी करून आपण एका अर्थानं पर्यावरणाची जपणूक करायला मदतच करत असतो.
या कलाकृती फक्त गिफ्ट म्हणून नाहीतर घरात, व्यवसायाच्या ठिकाणी सजावट करायला देखील उपयोगी पडतात. त्या दृष्टीनं इंटिरिअर डेकोरेटर, आर्किटेक्ट यांच्यासाठी देखील इथली भेट उपयुक्त ठरेल. पूर्ण भारतभरातल्या वस्तू इथं उपलब्ध आहेत. त्यात मुख्यतः बांबू, सिरॅमिक, मोझेसच्या लॅम्प शेड्स, घराला लावण्यासाठी तोरणं, हँगिंग्ज आहेत. मुख्यतः आदिवासी चित्रं आहेत. लोकांचा प्रिंट आणि पेंटिंगमध्ये खूप गोंधळ होतो. इथं अस्सल आणि औथेंटिक आदिवासी पेंटिंग्ज आहेत. याशिवाय फर्निचर, धातूची शिल्पं, ढोकरा आर्टसारख्या जुन्या किंवा रॉट आयर्नपासून बनवलेल्या तसंच ब्रासच्या कलाकृती आहेत. आजकाल फेंगशुईनुसार जी विंडचिम्स लोकांना हवी असतात, ती बांबूची विंडचिम्स इथं मोठ्या प्रमाणात आहेत.
या उपक्रमाची गरज :
या उपक्रमामुळे असंख्य आदिवासी आणि रिमोट भागात राहणाऱ्या ग्रामीण कलाकारांना उपजीविकेचे एक साधन मिळू शकलं आहे. काही आदिवासी कला आणि जमाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना जर आपण वेळीच आश्रय दिला नाही तर आपल्या देशातील कला व संस्कृतीचा हा समृद्ध वारसा लवकरच नष्ट होईल. त्यांना प्रमोट करण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे. या सगळ्या वस्तू ऑनलाईन पण उपलब्ध आहेत मात्र प्रत्यक्ष येऊन या बघण्याचा आनंद आणि अनुभव वेगळाच असतो, तो प्रत्येकानं जरूर घ्यायला हवा.
तर मग वाट कसली बघताय!!!
USP – इतर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे कसे, काय सांगाल —
या क्षेत्रात काम करण्याचा 20 वर्षाचा अनुभव असल्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि काम करण्याऱ्या बद्दल प्रचंड कौतुक आहे आणि त्यांची ही कला जगा पर्यंत नेता यावी ती ही जशी चा तशी..हा आमचा आग्रह . शिवाय ती वस्तू/कला जन सामान्यांना पण घेता यावी आणि आपल्या घरात सजवता यावी हे त्या मागचे उद्देश. सतत नवीन नवीन प्रयोग करून वेग वेगळ्या निराळ्या भेट वस्तू/ सजावटीसाठी चा वस्तू/दिवे/ आणि विशेष म्हणजे सगळे काही पर्यावरणपूरक असतील या कडे आमचा कल असतो.
यशस्वी व्यावसायिकांमध्ये कुठले गुण असावेत असे तुम्हाला वाटते–
Social entrepreneurship प्रकार मध्ये आम्ही येतो आणि सगळ्या गोष्टी हाताने बनवलेल्या असल्यामुळे Demand आणि supply मध्ये तफावत येते. पण व्यवसाय म्हंटला की ग्राहकाला त्याला जे हवे आहे ते कसे तयार होते ते समजावून सांगणे त्या पासून ते कलाकाराला गाठून ती वस्तू वेळेत मिळवणे ही तारे वरची कसरत असते.पण आता लोकं बरींच जागरूक झाली आहे, त्या मुळे अशे जागरूक आणि समाधानी ग्राहक आपोआप तयार होतात. आपण प्रामाणिक असणे आणि उत्तम सर्व्हिस देणे बाकी आपले प्रॉडक्ट्स बोलतात!!!!
Poorva Paranjape Tribe Chatari
Address – 17, Parvati Pune Mahila Mandal Building, 1st floor.
Facebook : https://www.facebook.com/TribeChatari/
Contact : 9156593771
Email : asmimegaenterprises@gmail.com
Add comment