Business Icon

शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह मुंडवा येथील अनाथ निराधार निराश्रित तसेच विधी संघर्षित मुलींसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे पार्वतीचा उपक्रम

१ डिसेम्बर २१ : रोटरी क्लब ऑफ पुणे पार्वतीने ‘Peace and conflict resolution’ या रोटरीच्या फोकस एरियाखाली प्रोजेक्ट केला. शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह मुंडवा येथील अनाथ निराधार निराश्रित तसेच विधी संघर्षित मुलींसाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ‘शिवण कला तसेच शिवणयंत्र दुरुस्ती’चे एक प्रशिक्षण, जन शिक्षण संस्थान मार्फत घडवून आणले. विधी संघर्षित मुले तसेच मुलींसाठी आपण करीत असलेल्या प्रोजेक्ट्सच्या मालिकेतील हा दुसरा प्रोजेक्ट असून तो रोटरी क्लब ऑफ पुणे पार्वतीने SOSVA Training and Promotion Institute (STAPI) यांच्या मदतीने घडवून आणला.

या प्रोजेक्टला क्लब तर्फे रो. किरण वाळिंबे तसेच २३-२४ साठी निर्वाचित अध्यक्ष रो. स्वानंद समुद्र, STAPI तर्फे श्री.प्रसाद कुलकर्णी, शासकीय मुलीचे निरीक्षण गृहातर्फे त्यांच्या अधीक्षिका श्रीमती वैशाली त्रिभुवन तसेच प्रशिक्षक श्रीमती गीता राजपूत उपस्थित होते. दुपारी ११ वाजता सुरु झालेले आजचे प्रशिक्षण पूर्ण दिवसभर चालले. याचा लाभ एकंदर १५ मुलींनी घेतला.

Business Icon

Add comment