Business Icon

Meet Shweta Dhamapurkar of Queen’z Beauty Salon Spa and Academy.

तुमच्या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे ?

मी करत असलेला व्यवसायाचे सौंदर्य क्षेत्रात त्या संदर्भात देण्यात येणारी सेवा आणि शिक्षण महिला व मुलींसाठी देणे अशा स्वरूपाचा आहे . आज च्या धक्काधकी च्या जीवनात महिला नोकरी साठी बाहेर पडत असल्याने त्यांचे घरातील कामे करून नोकरी करणे यामध्ये स्वतःच्या त्वचा व केसांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष होऊन त्याने आजार होऊन सौंदर्य खराब होत चालले आहे , याच बाबतीत असलेले मार्गदर्शन , सेवा व शिक्षण देऊन त्यांचे सौंदर्य टिकवून राहावे यासाठी मी ह्या व्यवसायाची निवड केली.

USP – इतर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे

ह्या क्षेत्रात शिकण्यासारखे बरेच काही आहे जसे की प्रगत तंत्रज्ञान, मशीन उपचार पद्धती, नवनवीन सौंदर्य प्रसाधने ह्या बाबतीत ह्या क्षेत्रच दिवसेंदिवस श्रेणी सुधारित होत आहे तर मी स्वतः यासाठी उपयोगी अश्या ABTC, CIDESCO, CIBTAC सारखे शिक्षण घेऊन परीक्षा देऊन हे ज्ञान प्राप्त केले असून मी माझ्या कडे येणाऱ्या महिलांना व मुलींना सुद्धा या बाबतीत माहिती देऊन त्याचे महत्व पटवून देऊन शिवाय सर्व वर्गीयाच्या प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी त्यांना ही सेवा देण्याचे काम करीत आहे व माझे ग्राहक ही खुश होऊन पुन्हा पुन्हा येतात त्यामुळे मला वाटते की मी नक्कीच इतर स्पर्धकां पेक्षा वेगळी आहे.

With Hon. Trupti tai Desai and our dynamic staff

तुमच्या या सेवेतून समाजातील कुठली गरज तुम्ही पूर्ण करत आहात व कशी करत आहात ?

मला वाटते की मी माझ्या सेवेतून समाजातील स्त्रियांना मुलींना अगदी सोप्या भाषेत , सोप्या पद्धतीने शिक्षण देऊन, जे शिकवले जाते त्याचा ज्या त्या वेळी सराव घेऊन ती गोष्ट व्यवस्थित जमत नाही तोवर शिकवून त्यांना त्यांचा पाया भक्कम करून स्वतः च्या पायावर उभं करीत आहे.. महिला सक्षमीकरणाचे उत्तम कार्य मी करत आहे

यशस्वी व्यावसायिकांमध्ये कुठले गुण असावेत असे तुम्हाला वाटते?

जर आपण आपल्या कामात व्यस्त राहिलो व त्या कामात सातत्य कायम ठेवले आपली स्वतः ची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि सर्वात महत्त्वाचं की लोकं काय म्हणतात म्हणतील या कडे जर दुर्लक्ष केले तर नक्की च आपण आपला व्यवसाय प्रगती पथावर नेऊ शकतो , यशस्वी करू शकतो

Shweta Sanjay Dhamapurkar
Contact no: 7350485087
Instagram: https://instagram.com/shweta.dhamapurkar?igshid=ZDdkNTZiNTM=
https://instagram.com/queenz.beauty.salon.academy?igshid=ZDdkNTZiNTM=
Facebook: https://www.facebook.com/Queenzbeautyacademy?mibextid=ZbWKwL
https://www.facebook.com/smita.khedekar.779?mibextid=ZbWKwL

Business Icon

Add comment