Book Name : स्थलांतरित पक्षी (यवतमाळ सभोवतालच्या जलाशयांवर परदेशातून येणारे)
Language : मराठी
Author : प्रा. डॉ. प्रवीण जोशी
Category : माहितीपर
Publication : Business Icon
Pages : 98
Price : Rs. 150/- (INR), USA Dollar : $ 3
पुस्तकाविषयी थोडक्यात :
प्रा. डॉ प्रवीण जोशी लिखित “स्थलांतरित पक्षी (यवतमाळ सभोवतालच्या जलाशयांवर परदेशातून येणारे) ” या ई-पुस्तका मध्ये यवतमाळ जिल्ह्यात आढळणाऱ्या व जगभरातून येणाऱ्या ३४३ पक्ष्यांच्या नोंदींपैकी परदेशातून जलाशयांवर येणाऱ्या सुमारे ६४ पक्ष्यांचा उल्लेख या पुस्तकात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील समृद्ध पक्षी संपदे विषयी माहिती देणारे हे मराठी भाषेतील पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ठय सांगायचे झाल्यास पक्ष्यांचे हायएंड कॅमेऱ्यातून टिपलेले उत्तम फोटो बघायला मिळतील. साधारणतः पक्ष्यां विषयीच्या पुस्तकात पक्ष्यांच्या शरीररचने विषयीची जी माहिती असते त्यापलीकडे जाऊन पक्ष्यांचे सरासरी आयुष्य, नेमके खाद्य,फोटोतील अवस्था, संरक्षण स्थिती, स्थलांतराचा प्रकार आणि काही ठळक वैशिष्ट्ये जी पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसोबतच सर्वसामान्य वाचकांसाठी अतिशय नवीन व कुतूहल निर्माण करणारी आहे. ती वाचकांना निसर्गाविषयीचा एक नवा दृष्टिकोन नक्की देईल.
दुसरे म्हणजे हे पक्षी यवतमाळ सभोवतालच्या ज्या १६ जलाशयांवर येतात त्यांचे वर्णन अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने व पक्षी निरीक्षकांना अपेक्षित असणारेच आहे जसे यवतमाळ पासून जलाशयाचे अंतर, जाण्याचा उत्तम मार्ग, केव्हा कुठे कोणत्या दिशेने कोणत्या महिन्यात कोणते पक्षी दिसतील याची संक्षिप्त माहिती या पुस्तकात दिली असल्यामुळे यवतमाळमध्ये येणाऱ्या पक्षी निरीक्षकांना त्यांच्या वेळे नुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
एका वाक्यात सांगायचं झालं तर पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी, सर्वसामान्य वाचक तसेच निसर्गा विषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाच्या हे पुस्तक पसंतीस पडेल व त्यांना पक्षी निरीक्षण करताना न चुकणारी पायवाट दाखवेल असे हे पुस्तक आहे.