तुमच्या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे ?
रूबाबदार मराठी हा महाराष्ट्रातील पहीला असा क्लोथिंग ब्रांड आहे जो संपूर्णतः मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी मातीचा इतिहास याला समर्पित असे टि-शर्ट व अन्य कपडे प्रिंट करत असून मराठी असल्याचा सार्थ अभिमान हा नवीन पिढी बरोबरच जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आज आपण खोटे सुपर हीरो प्रसिद्ध करतो पण आपल्याच मातीत मातीसाठी लढणारे कटून मरणारे आपले मावळे आपले खरे खुरे सुपरहीरो आहेत त्यांचा लुप्त झालेला इतिहास नव्या पिढीपर्यंत त्यांच्याच पद्धतीने पोहोचवण्याचे काम रूबाबदार मराठी रूबाबात करत आहे.
USP – इतर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे कसे, काय सांगाल–
रूबाबदार मराठीची खासीयत म्हणा कींवा हट्ट पण रूबाबदार मराठी चे टि-शर्ट कींवा शर्ट यावर कोणतीच पश्चिमी संस्कृती दर्शवणारी डिझाईन इंग्रजी भाषा भाषेतील वाक्य साधे अक्षर सुध्दा दिसणार नाही याचा निर्धार रूबाबदार मराठी ने केला आहे..इंग्रजी भाषेचा द्वेष म्हणून नाही पण मराठी भाषेचा गर्व म्हणून रूबाबदार मराठी ने घेतलेला हा निर्णय आहे.
तुम्ही विकत असलेले प्रॉडक्ट्स मुळे समाजात काय बदल घडून येऊ शकतो किंवा येतोय–
आज आपण बघतो आपली लहान लहान मुले अस्खलित इंग्रजी बोलतात काही नवीन पद्धतीच्या संगीतामुळे हिंदी देखील स्पष्ट बोलतात पण हीच मुले मराठीत मागे पडतात मराठी भाषेत कमी गुण मिळवतात काही मराठी तरुण मुलांना तर चार चौघात मराठी बोलायची सुध्दा लाज वाटते अशावेळेस ते कळत नकळत मराठी भाषेसाठी लढा देणाऱ्या आपल्या कित्येक महापुरुषांचा अपमान करतात रूबाबदार मराठी जे टि-शर्ट किंवा अन्य कपडे प्रिंट करतात ते या नव्या पिढीपर्यंत हीच गोष्ट पोहचवण्यासाठी आहे की आपल्या भाषे इतकी सुंदर भाषाच नाही आणि आपल्या इतका अतिश्रीमंत इतिहास कोणाचाच नाही आणि ह्याचा अभिमान आपण घेऊन मिरवायलाच हवा हाच अठ्ठाहास रूबाबदार मराठीत चा आहे.
यशस्वी व्यावसायिकांमध्ये कुठले गुण असावेत असे तुम्हाला वाटते, तुमच्या मते यशाचा मंत्र काय?
खरतर मी सुरज महेंद्र मोरे आणि माझी पत्नी प्राची सुरज मोरे आम्ही खूप कठीण काळात ह्या व्यवसायाला सुरुवात केली इतिहास आणि महाराजांचे वेड लहानपणापासून होतेच त्यासाठी काहीतरी करावे हा भव्य इतिहास आपल्या मार्फत कीमान दहा लोकांपर्यंत जरी पोहचला तरी समाधान मिळेल असे वाटायचे त्यातच आपली लहान लहान मुले ज्यांना अवेंजर हल्क कॅप्टन अमेरीका वैगरे सारखे खोटे हीरो माहीत पण तानाजी मालुसरे यसाजी कंक जीवा महाले कोंडाजी फर्जंद हे माहीत नव्हते त्यामुळे त्यांच्याच पद्धतीत मावळ्यांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहचावा म्हणून सुरू केलेला हा टि-शर्ट ब्रांड यशाचा मंत्र असा आम्हास तरी अजून ठाऊक नाही कारण आम्ही आज ही एक एक पायरी चढतोय हळूहळूच पण प्रत्येक पाऊल भक्कम असावे हीच भावना आर्थिक मदत मिळवण्यात आम्हास खूप प्रयत्न करावे लागतात कालण मराठी माणूस आणि धंदा हे समीकरण बर्याच जणांच्या पचनी पडत नाही तरी आम्ही उभे आहोत राहू अगदी रूबाबात तरी यशाचा मंत्र म्हणाल तर अपयशाला न घाबरता पुढे चालत राहणे मार्ग नसेल तर खोदून नवीन बनवा पण थांबू नका.
Suraj Mahendra More
Brand Name: Rubabdaar Marathi
Email: Surajmorek11@gmail.com
Website: https://rubabdarmarathi.blogspot.com/?m=1
Instagram : rubabdarmarathi_clothing_
Add comment