Book Name : दीपस्तंभ
Language: मराठी
Authors: प्रा. प्रदीप कापरे
Category: काव्यसंग्रह
Publication: बिझनेस आयकॉन (होरायझन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेस)
Pages: ४९
किंमत: ई बुक – Rs ६०/-
US Dollar – $ 1
पुस्तकाविषयी थोडक्यात :
प्रा. प्रदीप कापरे यांचा ‘दीपस्तंभ’ हा दुसरा काव्यसंग्रह असून पहिला काव्यसंग्रह ‘दीपकाव्य’ याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर काही वाचकांच्या आग्रहानुसार हा काव्यसंग्रह तयार केला आहे.
ह्या पुस्तकाचे वैशिट्य म्हणजे प्रा. कापरे यांनी दैनंदिन जीवनातले विषय हाताळले आहेत. त्या विषयांना अनुकूल साधे, सरळ शब्द वापरले आहेत. आपली बोली भाषा वापरली आहे. त्यामुळे कविता घरगुती आणि जवळच्या वाटतात. साधारणपणे ४ कडव्यांच्या कविता आहेत. त्यामुळे पाल्हाळ कुठेही नाही. कवीच्या मनांतील विचारात स्पष्टता आहे हे जाणवते. विषयांची विविधता आहे. जीवनातील घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आहे.
सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आणि घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, योग्य यमक जुळविण्याचा केलेला प्रयत्न इत्यादी वैशिष्ट्यांमुळे कवितेचा आशय मनास भावतो. कवीने मनातील विचार लेखणीच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने काव्यबद्ध केले आहेत त्यामुळे मनोरंजनाबरोबरच दर्जेदार साहित्य वाचल्याचे समाधान वाचकास मिळेल याची खात्री वाटते.
Add comment