आपल्याला IPL माहीत आहे. आता ILP माहीत करून घेउ.!!!
मी ट्रेनिंग देताना नेहमी विचारतो, ” तुम्ही शिकणार? का मी शिकवणार? ” वेगवेगळी गंमतशीर उत्तरे मिळतात! !! मग मी विचारतो, “मी शिकवणार, म्हणजे काय? ” उत्तरे मिळतात: “माहिती देणार ” ,” समजून सांगाल “. मित्रानो, आता टेक्नॉलॉजी मुळे, “माहिती देणार ” हे काम मी करत नाही! !! ते यूट्युब करत.!!!! मी आता फक्त समजून सांगतो!!! त्यामुळे आता ILP. (I Learn Program).
मी Operations management मध्ये कंपन्यांना मदत करतो. माझ्या एका क्लायंटने erp घेतली. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की erp चा वापर जितका हवा आहे तितका केला जात नाही. त्याने मला ही गोष्ट सांगितली. मला कळलं की बरयाच मंडळींना erp बद्दल प्रश्न आहेत. मी काही गोष्टी स्पष्ट केल्या. पण तरीही अनेक गोष्टींची माहिती दिली जाण्याची गरज होती. एवढा वेळ देता येणार नाही, हे लक्षात घेऊन मी ILP हि संकल्पना मांडली .
ह्या कंपनीने ILP चा पुरेपूर उपयोग करून घेतला. ERP , EXCEL आणि MIS मध्ये एकसे एक जण तरबेज झाले आणि आता बहुतेक प्रश्नांची सोडवणूक स्वतः करु लागले आहेत.
काही कंपन्यांनी ILP 2025 हा कार्यक्रम हाती घेतला आहे. ह्यामध्ये 2025 सालापर्यंत करायच्या सगळ्या सुधारणा समाविष्ट आहेतच, शिवाय सेल्स टार्गेट, मार्जिन टार्गेट सुद्धा समाविष्ट केले आहेत.
ILP म्हणजे काय? अगदी थोडक्यात सांगायचे तर असा कार्यक्रम कि जो प्रश्न सोडवायला मदत करतो, सगळ्यांना आवडतो आणि फायदाही देतो आणि पुढच्या वाटचालीस चालना देतो. कंपन्या मला त्यांचे प्रश्न सांगतात, पुढे उत्तरापरयंत मी पहातो! ! जो प्रश्न सोडवायचा आहे, त्या संदर्भातील व्हिडिओज टिमला शोधायला सांगतो. त्यांना ते व्हिडिओज मला समजावून सांगायला लावतो. जे समजावून सांगायला जमत नाही, ते मी समजावतो. हया चर्चेत उत्तर मिळुन जाते आणि मग ते सगळे मिळून implement केले जाते. ह्या मध्ये खुप वेळ वाचतो आणि ऊत्तर शोधणे सोपे आणि मजेत होते. हे ILP-V म्हणजे, ILP Video. अशी अनेक suitable versions आहेत.
मी ही गोष्ट छोट्या कंपनी मध्ये वापरता येईल का ते पाहीले. आणि छोट्या कंपनी मध्ये सुद्धा खूप छान उपयोग झाला.
हाच प्रयोग करून मी मग वेगवेगळ्या विषयांवर ILP सुरू केले. Inventory reduction, Dispatch schedule, defects reduction, sales increase, ppc, आणि अनेक.
मला एका कंपनीच्या मालकाने फार सुंदर प्रश्न विचारला. त्याने विचारले, “साठेसर, आमच्या कंपनीत मी शिकवतो, तर कुणी शिकत नाही. आणि तुम्ही म्हणता ILP? ” मी म्हणालो ” तुमच्या कंपनीत सुद्धा लोक स्वतः शिकतात! !” मालक चपापले. मी विचारले,” तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या पैकी किती जण स्मार्ट फोन वापरतात? आणि त्याना ते कुणी शिकवले? ते स्वतः शिकले ना? ” दोन कारणांसाठी लोक स्वतः शिकतात. एक म्हणजे स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे काहीतरी मिळेल म्हणून. काही कंपन्या शिकून काम केले तर पगार वाढ करण्यात येणार आहे असे कबूल करतात आणि देतात.
आज कंपन्या एकमेकांचे मॅनेजर ढापून आपली गरज भागवत आहेत. त्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. ILP मुळे आपल्याला कुणाचा मॅनेजर ढापायला नको आणि आपल्या मॅनेजरला कुणी ढापणार नाही
आपल्याला असलेले काही प्रश्न हे बाकी कंपन्यांना सुद्धा असू शकतील. असे प्रश्न आपण एकत्र येऊन Krishna Valley Chamber of Industries & Commerce, Sangli च्या मदतीने सोडवून घेउ. ही संस्था सहकार्यासाठी नेहमी तत्पर असते. आपण आपले प्रश्न समोर मांडले पाहिजेत.
आपल्या कंपनीत कामाला लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी, तसेच सुधारणा करण्यासाठी लोकांना काही गोष्टी माहीत असायला हव्या. अगदी सिनियर पासुन ज्युनियर पर्यंत आणि मालकापासुन कामगारा पर्यंत. हे सगळं कमी कष्टाने आणि कमी खर्चात करण्यात ILP मदत करेल.
आपल्याला Skilled labor, managers मिळत नाही, म्हणून, आहे त्याना आपल्याला शिक्षण दिले पाहिजे. जेव्हा पगार हा महागाई मुळे न वाढवता तो जास्त काम कमी वेळात केल्या मुळे वाढवता येईल, तेव्हा पगार देणारे आणि पगार घेणारे दोन्ही सुखी आणि समाधानी होतील.
मग काय? प्रश्न आहेत? मग कळवा मला, सोडवायला आहे ILP!!!!
Add comment