Business Icon

Meet Shashikala Watve of AVS International Trade

तुमच्या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे ?

माझा साडी सेलिंग चा ऑनलाईन बिझनेस आहे एथनिक फॅशन ह्या ब्रँड ने मी साडी सेलिंग करते.. एथनिक फॅशनचे वैशिष्ट्य आहे की वेगवेगळ्या राज्यातला पारंपारिक हातमागावर विणलेल्या साड्या अगदी वाजवी दरात तुम्हाला घरपोच मिळतील.. गेले तीन वर्ष एनिक फॅशनचा माझा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी.. मी खूप मेहनत घेतली आहे.. लॉकडाऊन च्या काळात माझा बिजनेस मंदगतीने चालत असताना देखील मी मात्र ऑनलाईन वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून आणि त्या स्पर्धेत इतर माझ्या सम व्यावसायिकांकडून स्पॉन्सरशिप मिळवून महिलांना बरेच छान छान गिफ्ट दिले आहेत.. खास करून कोविड योद्धांसाठी सुद्धा स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये 101 महिला सहभागी होत्या आणि त्या सगळ्यांना गिफ्ट सर्टिफिकेट दिले गेले… वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये मी स्वतः देखील बऱ्याच ठिकाणी स्पॉन्सरशिप दिली आहे ..माझा उद्देश एकच होता की एथनिक फॅशनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे… यामुळे माझ्या कार्याची दखल बऱ्याच  मीडियाने घेतली… प्रहार, नवा प्रवाह, बिट्स अँड बाईट्स, विदर्भ प्रिंट, युक्ती मीडिया, हॅलो मुंबई यासारख्या प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया यांनी माझ्या कामाचा प्रवास आर्टिकल द्वारे लोकांपर्यंत पोहोचविला.

USP – इतर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे कसे, काय सांगाल–

एथनिक फॅशन ची USP अशी आहे की प्युअर सिल्क प्यूअर कॉटन हॅण्डलूमच्या साड्या तुम्हाला सहज उपलब्ध होतील..
माझा ब्रांड हा जगभर कसा पोहोचेल  याचा विचार करत असताना मी एक्सपोर्ट इम्पोर्ट ची ट्रेनिंग घेण्याचे ठरवले आणि एक्स्पोर्ट इम्पोर्ट ची ट्रेनिंग घेतली आणि AVS International Trade  ही कंपनी ओपन केली आहे.. या कंपनी द्वारे माझ्या साड्या आणि माझा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचणार आहेच परंतु इतर महिलांचे प्रॉडक्ट सुद्धा जगभर जावे त्यासाठीही आपली कंपनी काम करणार आहे..

यशस्वी व्यावसायिकांमध्ये कुठले गुण असावेत असे तुम्हाला वाटते, तुमच्या मते यशाचा मंत्र काय?

सक्सेस मंत्रा हाच असेल की आपल्या प्रोडक्सचे आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मार्केट अनालिसिस करणे आणि सेलिंग स्किल शिकणे हे देखील बिजनेस करण्यासाठी फार आवश्यक असतं.. त्याचबरोबर आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करायला हवा आणि नेटवर्किंग साठी सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटायला हवं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर सक्सेस मिळणारच..

Contact : +91 86919 59232
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100008916907663&mibextid=ZbWKwL
Instagram : https://www.instagram.com/invites/contact/?i=po5khqwy8zgd&utm_content=cnf3h83
LinkedIn : https://www.linkedin.com/in/shashikala-watve-3b3807179

Business Icon

Add comment