Skip links

लेखणीत गुंतवणूक करणारी बँकर सौ.वंदना विजय धर्माधिकारी

वंदनाताईंची मुलाखत घ्यायला सुरवात करतानाच त्यांनी कवितेच्या काही ओळी ऐकवल्या आणि बरेच काही सांगितले.

अलका बापूराव भोमे मी, १९७६ साली आले सासरी
विजयची मी वंदना आडनांव धर्माधिकारी
आहो, सगळेच माझ्या पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी
मला दोन मुली, जान्हवी आणि वल्लरी
२८ वर्षे बँक ऑफ इंडियात केली नोकरी
२००० साली घेतली व्हीआरएस आणि निवांत बसले घरी

बँकेतली नोकरी, ऑफिसरच्या बदल्या जबाबदार्या आणि घेतलेली व्हीआरएस. आता पुढे काय? तर उत्तर दिले निवांत बसणे. असं म्हणाल्या फक्त. त्याच्या आयुष्याने एक सुंदर कलाटणी घेतली. त्याने सेकंड इनिंगमध्ये एक लेखिका, निवेदिका, कवयित्री, परीक्षक, मुलाखतकार, मार्गदर्शक अशी बिरुदे लावतं आपली वेगळी ओळख निर्माण केली. म्हणून तर त्या आज आपल्यात “Women of Influence-2022” मध्ये आल्या आहेत.

विरोधी पक्ष नेते मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते पा.वा.गाडगीळ पुरस्कार स्वीकारताना

बायका स्वत:कडे दुर्लक्ष करतात, नोकरी संसार सांभाळताना ‘मला काय हवे? बघितलेच जात नाही. वंदनाताईंना स्वेच्छानिवृत्तीनंतर समजले. हातात आलेली लेखणी चौफेर विस्फारली, फुलली, सरसर सरली. विविध अंगाने, रंगाने, कथा, कविता, मुलाखती, पुस्तके, लेख, तर असेतसे करताना इथेतिथे या दिसायला लागल्या. मराठी वर्तमानपत्रात इथेतिथे असतातं. त्यांची सात बँकिंगची पुस्तके ‘सकाळ प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेली आहेत. ‘सकाळ’सह लोकांचे सहकार्य वेळोवेळी मिळाले या सर्वांप्रती वंदनाताईंनी कृतज्ञतेच्या भावना बोलताना व्यक्त केल्या. “खूप माणसे मला मिळाली, ही मोलाची लेखणीची देणगी आहे.” असे म्हणतात.

आता एकवीस वर्षाच्या काळात वंदनाताईंची १५ पुस्तके आहेत. बँकिंग विषयाची वेगवेगळ्या भाषांमधली १० आहेत. मराठीतसह इंग्लिश,हिदी,गुजराती व ब्रेल अशी दहा पुस्तके आहेत. त्यापैकी काहींच्या अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. “मैत्री बँकिंगशी”–बेस्ट-सेलर-१२ आवृत्त्या आहेत. तीन बँकांनी पुस्तकाच्या स्वतंत्र आवृत्त्या घेतल्या. दोन बँकांनी पुस्तकावर परीक्षा घेतल्या. हिंदी पुस्तक तसेच प्रसिद्ध लेख यांना मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. यावरून लेखणी कशी असेल असा प्रश्न डोकावतो. अतिशय साधी, सरळ, सोपी, अभ्यासपूर्ण, समजेल अशी आहे. बँकेची पायरी चढणे ते युनिकॉर्न असा मोठा विस्तार लेखणीचा आहे. लेखिका म्हणतात,”मी फक्त आर्थिक विषयी लिहित नाही, तर त्याबरोबर अर्थसंस्कार देते, कारण, पैसा हाताळताना मानवी मुल्ये तुडवली जाऊ नयेत या हेतूने.”

मित्रता बँकिंग से प्रकाशन ८ जून,२०१४

‘मैत्री बँकिंगशी-ब्रेल रुपांतरीत तीन-खंड’आहेत. ब्रेलरीडरवर पाच पुस्तके आहेत. आर्थिकविषय लिहिणाऱ्या स्त्री लेखिका- वंदनाताईंच्या लेखणीने बरेच यश मिळवले आहे. अर्थपूर्ण मासिकाच्या पहिल्या अंकापासून लेखिका आहेत. दहा लेखमाला, अनेक आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती जमेस आहेत. अशी लेखिकेची भरारी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. लवकरचं मैत्री बँकिंगशी पुस्तकाचे कानडी रुपांतरीत पुस्तक येईल. “मैत्री बँकिंगशीचे रुपांतर सर्व भारतीय भाषांमध्ये व्हायला पाहिजे” असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

एका सहकारी बँकेने ग्रामीण महिलांना बँकिंग शिक्षीत करताना खासगी वितरणासाठी तीन पुस्तके वंदनाताईं कडून लिहून घेतली. त्यापैकी दोन पुस्तकांची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यापैकी एका पुस्तकाची मागणी १५५०० प्रतींची होती. संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी, वाडयावस्तींवरील महिलांना प्रशिक्षण देऊन पुस्तके दिली जातात. तिसरे पुस्तक कर्ज घेणाऱ्या स्त्रीयांना दिले जाते. यावर वंदनाताई म्हणाल्या, “बँकेत काम करीत असताना फसवणूक झाली, नुकसान झाले असे प्रकार दिसायचे. वाटायचे, यांना समजेल अशा भाषेत सगळं कुणीतरी सांगायला पहिजे. तेच काम मी करीत आहे. यात मिळणारे समाधान अगदी शब्दातीत आहे. आपल्या भारत देशास अर्थसाक्षरतेची नितांत गरज आहे. त्यासाठी माझी लेखणी किंचित तरी कामास आलेली आहे, याचा मला रास्त अभिमान वाटतो.” देशासाठी काहीतरी!! या कामाची दखल घेतली गेली “पुण्याचा अभिमान” पुरस्काराने.

शांताबाई शेळके स्मृतिदिन -अतिथी वक्ती -मुंबई मराठी ग्रंथस्न्ग्रहालय – ऑक्टो २०१३

वंदनाताईंनी स्वत:तर भरारी घेतलीच आहे. शिवाय, दर महिन्याला एका ज्येष्ठ स्त्रीने मारलेली ‘ती ची भरारी’ एका मासिकातून अनेकांपर्यंत पोचवतात. त्या म्हणतात, ’आजकाल, थोडं जरी यश मिळालं, कौतुक केलं गेलं की लगेच फेसबुक, इंस्टांग्राम, व्हॉट्सअॅप सर्वत्र बोलबाला होतो. म्हणून आम्ही आधीच्या पिढीतल्या प्रसिद्धपरांङमुख असलेल्या स्त्रियांच्या मुलाखती आधी घेत आहेत. त्या स्वत:हून पुढेपुढे करण्यात मागे पडल्या आहेत.” यावरून, दुसऱ्याचा विचार करण्याचा स्वभाव लक्षात येतो.

कथा, कविता, मुलाखती, ललित वैचारिक असे बरेच लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. सर्वात गाजलेली लेखमाला लोकसत्ता-चतुरंग—“फक्त तीन शब्द” होय. लिखाण म्हंटले की पुरस्कार आलेच. काव्य लेखन व सादरीकरण यांस कालिदास पुरस्कारासह इतरही पुरस्कार मिळाले आहेत. जसे कवितेचे तसेच कथांचे. मध्यंतरी, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील काही नामवंत कथा लेखकांचा प्रातिनिधिक कथा संग्रह काढला गेला, त्यात वंदनाताईंची कथा आहे. “घायाळांची मोट” कथासंग्रहातील कथा वाचताना खरंच घायाळ व्हायला होते. तसेच “…आणि म्हणूनच गं!” कवितासंग्रह आणि सादरीकरण आहे.

लेखणी हातात आली आहे, लिहायला जमतं, लोकांना आवडतं तर लेखणीचे सर्व प्रकार हाताळण्याचा त्यांचा मानस आहे, तसे प्रयत्न देखील आहेत. असे सगळे असल्यावर विशेष म्हणून बोलावणे येते, स्पर्धा परीक्षक व्हावे लागते, व्हीझिटिंग लेक्चरर म्हणून मार्गदर्शन दिले जाते. मुलाखती होतात. कवी संमेलने, कथाकथन, वेबिनार्स, आकाशवाणीवर कविता सादरीकरण तसेच बँकिंग मार्गदर्शन, गाणी गप्पाटप्पा, तर कधी अध्यक्षपद आणि असेच इतरही काहीबाही.

समारोपाकडे येताना वंदनाताई त्यांना भेटलेल्या, फोन केलेल्या व्यक्तींचा उल्लेख करतात. यात दृष्टिहीन विद्यार्थीही आहेत. त्या म्हणतात, “लेखणीने मला खूप माणसे भेटली. अगदी शेतावर झाडाखाली बसून पुस्तक वाचणाऱ्यापासून ते बँकिंग क्षेत्रात अतिउच्च पदभार सांभाळणाऱ्या लोकांशी माझा परिचय झाला. त्यांच्या शुभेच्छा मी गोळा करते. आणि आता लेखणीत गुंतवणूक करते.”

प्रकाशित पुस्तके

वंदना धर्माधिकारी यांना मिळालेले महत्वाचे काही पुरस्कार पुढे देत आहोत. याव्यतिरिक्तही बरेच आहेत.
उल्लेखनीय :
१. ऐश्वर्यवती – सकाळ लेखमाला-पुस्तक-कार्यक्रमात प्रकाशन व महाराष्ट्रात कार्यक्रम
२. शांता शेळके स्मृतिदिन-मुंबई- प्रमुख वक्ती निमंत्रित
३. अहमदनगर को-ऑप बँक्स=फेडरेशन –महिलादिन – निमंत्रित
३. मित्रता बँकिंग से – केंद्रीय हिंदी निदेशालय द्वारा पुरस्कृत महाराष्ट्र शासन पुरस्कार
४. पद्मश्री पां.वा.गाडगीळ- प्रसिद्ध विशेष आर्थिक लेखास पुरस्कार -दोन वेळा
५. श्रीमती पुणे २००५-संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धा वरिष्ठगट प्रथम-क्रमांक
६. दुर्गा पुरस्कार–सम्मान स्त्री शक्ति का An Initative of Aarohi WomenEmpowerment Group Power the powerful
७. साहित्य गौरव – साहित्य संमेलन अध्यक्षा – साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार
८. ज्येष्ठोत्सव २०१८ – “पुण्याचा अभिमान” गौरव सत्कार

ईमेल – vandana10d@yahoo.co.in
मोबाईल – +91 9890623915
फेसबुक पेज – https://www.facebook.com/vandana.dharmadhikari.5 | पैसा रे पैसा-अर्थसंस्कार
ब्लॉग – https://vandanadharmadhikari.blogspot.com
यु-ट्यूब – Vandana V Dharmadhikari

Share On:

Leave a comment